Stories From the Field
वृक्षारोपण व परिसर स्वच्छता अभियान – ९ ऑगस्ट २०२६
आज दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी रचना मेघस्पर्श भेंडे लेआउट येथ *हडस वृक्ष मंडळ, Olava Foundation आणि Green & Clean Foundation* यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व परिसर स्वच्छता अभियान* अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले..
वृक्षारोपणासोबतच परिसरातील काही भागात *स्वच्छता अभियान* देखील राबविण्यात आले. या उपक्रमामुळे आपल्या परिसरात हरित पट्टा निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. या कार्यक्रमाला *RMAC चे अध्यक्ष श्री. किशोर हेडाऊ, Olava Foundation चे उपाध्यक्ष श्री. उदय दिघे* आणि Green & Clean Foundation चे अध्यक्ष श्री. संदीप मानकर* यांची उपस्थिती लाभली. तसेच*शिवानी दाणी, अमोल शामकुळे, ईश्वर ढेगळे, श्री. खडगी, श्री. खडके, श्री. कोकाटे, श्री. नंदनवार, श्री. वाडिया, श्री. बोक्शे* तसेच अनेक *RMAC रहिवाशांनी* अत्यंत उत्स्फूर्तपणे व सक्रिय सहभाग नोंदविला. हडस वृक्ष मंडळातर्फे उपस्थित प्रतिनि:* श्री. अतुल सहस्रभोजनी श्री. संदीप तडस श्री. अनिरुद्ध ताकळे श्री. मिलिंद चौधरी सौ. विशाखा मोरोणे-निमखेडकर श्री. श्रीधर भाजीपाळे श्री. सुनील आडबे या उपक्रमासाठी आपला अमूल्य वेळ, श्रम, सहकार्य आणि पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी दाखविणाऱ्या प्रत्येक सहभागीचे मनःपूर्वक आभ आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे “हरित आणि स्वच्छ परिसर”* या संकल्पनेच्या दिशेने आज आपण एक सुंदर पाऊल पुढे टाकले आहे. यापुढेही अशाच प्रकारे वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबवत राहूया. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! “वृक्ष लावूया, वृक्ष जगवूया — आपला परिसर हिरवागार व स्वच्छ बनवूय!”*
गोधनी परिसरातील ३५ घरांच्या वसाहतीला भेट
दि. १४/०६/२०२६ रोजी (रविवार) ओलावा फाउंडेशनचे श्री. उदय दिघे व श्री. अरविंद कडबे यांनी नागपूर जिल्ह्यातील गोधनी परिसरातील ३५ घरांच्या वसाहतीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील विहीर व बोअरवेलमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईची
प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी, भूजल पातळीतील घट तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भूजल संवर्धन व जलस्रोतांचे पुनर्भरण (Recharge) करण्याच्या दृष्टीने विहीर आणि बोअरवेलसाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, रिचार्ज पिट, रिचार्ज शाफ्ट तसेच इतर प्रभावी जलसंवर्धन तंत्रांचा विचार करण्यात आला. तसेच विहिरीतील गाळ काढणे, स्वच्छता मोहीम राबविणे आणि विहिरीची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या विहीर स्वच्छता (Well Cleaning) उपक्रमाबाबतही चर्चा करण्यात आली. या उपाययोजनांमुळे भूजल पातळी सुधारण्यास, पाणी साठवण क्षमता वाढण्यास आणि परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ओलावा फाउंडेशनच्या या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात या भागात शाश्वत जलव्यवस्थापनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला............. श्री. उदय दिघे उपाध्यक्ष, ओलावा फाउंडेशन
सर्व नागपूरकर नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक व पर्यावरणप्रेमी यांना नम्र आवाहन
दिनांक २८ जुलै २०२६ रोजी दुपारनंतर नागपूर शहरात सुमारे १८० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, रस्ते जलमय झाले आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दुर्दैवाची बाब म्हणजे, या प्रचंड पावसातील जवळपास ८०% पाणी वाहून गेले. योग्य नियोजन
आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण व भूजल पुनर्भरण) प्रणाली प्रभावीपणे राबविली असती, तर या अमूल्य जलसंपत्तीचा मोठा भाग वाचवता आला असता. ओलावा फाउंडेशन, नागपूर आता या विषयावर ठोस पावले उचलण्याचा निर्धार करत आहे. शहरातील पाणी साचणारे (Water Logging) भाग ओळखणे, त्यांचा अभ्यास करणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिक, तज्ज्ञ, अभियंते, वास्तुविशारद, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या सहकार्याने काम सुरू करणार आहोत. आपल्या सर्वांचे सहकार्य मिळाल्यास, पुढील पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या कमी करण्यासाठी आपण निश्चितच सकारात्मक प्रयत्न करू शकतो. आपण काय करू शकता? आपल्या परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती द्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करा. स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या सोसायटी, संस्था, शाळा, महाविद्यालये व उद्योगांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था उभारण्यासाठी पुढाकार घ्या. या मोहिमेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा. "प्रत्येक थेंब वाचवूया, जलसंकट टाळूया आणि जलमय नागपूरऐवजी जलसमृद्ध नागपूर घडवूया." या संदेशासोबत जोडलेली छायाचित्रे कृपया पहा. ती सद्यस्थितीचे वास्तव चित्र दर्शवितात आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे कृती करण्याची गरज अधोरेखित करतात. आपल्या सहकार्याची अपेक्षा. उदय दिघे उपाध्यक्ष, ओलावा फाउंडेशन, नागपूर
Latest Updates
Small moments, meaningful actions, lasting impact.
डाॅ.हेडगेवार निवास,महाल तसेच देवलापार गोशाळेला भेट
लालबहादूर शास्त्री शाळेत दिवाळी मिलन कार्यक्रम
प्रबोधन काॅन्व्हेंट महाल ,नागपूर 15ऑगस्ट ला ओलावा फाऊंडेशन चा परिचय व विस्तृत माहिती देण्यात आली होती.न
ओलावा फाऊंडेशन कार्यालयामध्ये वैदिक स्वास्थ्य यह विषय पर प्रवचन करते श्री डा सुनील आर्य दिल्ली पंचगव्य एवं आयुर्वेदिक चिकित्सक
स्वास्थ्य प्रकल्पांतर्गत डॉ.सुनील आर्य यांचे प्रवचन छत्रपतीनगर येथे आयोजित केले होते.r
WATER SOLUTIONS FOR YOUR AREA
Have a Water Problem?
Let's Find a Solution Together.
From rainwater harvesting and groundwater recharge to water-body restoration, we work with communities to identify practical and sustainable solutions for local water challenges.
Olava Foundation works with communities & partners to conserve water, restore natural water systems and build sustainable solutions for generations to come.
CONTACT
- 9422112420 / 9423158936
- Nagpur,Maharashtra-440022
- Olavanagpur@gmail.com
© Copyright 2026 Olava Foundation, All Rights Reserved. Design and Development by Graycellsweb